देशातील उपाचाराधीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

Share This News

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : देशात उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यपूर्ण घट सुरू आहे. भारतात आज, शुक्रवारी उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1.51 लाख (1,51,460) पर्यंत खाली घसरली. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपेक्षा ही संख्या कमी आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या भारताच्या एकूण बाधित संख्येच्या केवळ 1.40 टक्के आहे. भारताच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येतही घसरण सुरू असून गेल्या 24 तासांत 12,408 नवीन रुग्णांची नोंद झाली. भारताची प्रति दहा लाख लोकसंख्येपैकी बाधित रुग्णांची संख्या जगातील सर्वात कमी संख्येपैकी एक आहे. रशिया, जर्मनी, इटली, ब्राझील, फ्रान्स, ब्रिटेन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा दर खूप जास्त आहे. देशातील 17 राज्यांमध्ये प्रति 10 लाख लोकसंख्येत बाधित रुग्णांची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केवळ लक्षद्वीपमध्ये प्रति दहा लाख बाधित रुग्णसंख्येची सरासरी सर्वात कमी 1,722 इतकी आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1.04 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 15,853 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.16 टक्क्यांवर पोहोचला आहे. मोठ्या प्रमाणात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे बरे झालेले रुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण यातील अंतर 1,03,44,848 पर्यंत वाढले आहे. काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 85.06 टक्के रुग्ण 6 राज्यांमधील आहेत.केरळमध्ये काल एका दिवसात 6,341 इतके सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 5,339 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये 517 रुग्ण बरे झाले. गेल्या 24 तासांत 12,408 नव्या रुग्णांची नोंद झाली. नवीन रुग्णांपैकी 84.25 टक्के रुग्ण 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. केरळमध्ये काल सर्वाधिक 6,102.नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,736 आणि तामिळनाडूमध्ये 494 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 12,408 नव्या रुग्णांची नोंद झाली. नवीन रूग्णांपैकी 84.25 टक्के रुग्ण 6 राज्यांमधील आहेत. केरळमध्ये काल सर्वाधिक 6,102.नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,736 आणि तामिळनाडूमध्ये 494 नवीन रुग्ण आढळले आहेत. भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 112 मृत्यू हे जगातील सर्वात कमी मृत्यूंपैकी एक आहे.

  देशात सुमारे 50 लाख लोकांचे लसीकरण

 भारतात 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सुमारे 50 लाख लाभार्थ्यांना देशव्यापी कोविड-19 लसीकरण अंतर्गत लस देण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 11 हजार 184 सत्रांमध्ये 5 लाख 9 हजार 893 लोकांना लस देण्यात आली. आतापर्यंत 95,801 सत्रे घेण्यात आली आहेत. लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांपैकी 61 टक्के लाभार्थी 8 राज्यांमधील आहेत. भारतात लसीकरण झालेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी 11.9 टक्के उत्तर प्रदेशातले आहेत. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.