राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अहमदाबादेत आजपासून समन्वय बैठक
आज ५ जानेवारी पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय अखिल भारतीय बैठक गुजरातच्या अहमदाबाद मध्ये सुरु झाली आहे. ५ जानेवारी ते ७ जानेवारी असे तीन दिवस हि बैठक चालणार आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर भाजप व नेत्यांमधील हि बैठक जात आहे. या बैठकीत आरएसएस चे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाच्या ३६ अनुषंगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा,भाजपचे महासचिव बी एल संतोष यांच्यासह अनेक नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. अहमदाबादच्या कर्णावती महाविद्यालयात संघ आणि भाजप नेत्यांची हि बैठक पार पडणार आहे. यंदा पाच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल,आसाम,केरळ,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या तीन दिवसांच्या बैठकीत बंगाल जिंकण्याची रणनीती ठरवण्याबरोबरच कृषी कायदे, शेतकरी आंदोलन या मुद्यावरही चर्चा होणार आहे.