अमरावती जिल्ह्यात रोजगार हमीच्या खोदकामात मिळाली तांब्याची नाणी
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात असलेल्या रोहिणीखेडा गावात मनरेगाच्या कामात मुगल कालीन तांब्याचे शिक्के आढळले आहे. हे सर्व शिक्के महसुल विभागाने ताब्यात घेतले असून जिल्हाधिकार्यांयच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
रोहणखेडा गावात मनरेगाचे अंदाजे 70 मजूर काम करत होते. खड्डे खोदण्याचे काम करता-करता एका मजुराला मटक्यात मुगल शासक कालीन 404 मुगल कालीन तांब्याचे शिक्के नाणे आढळले. याची माहिती स्थानीय पोलीस पाटील मार्फत धारणी पोलीस प्रशासन तहसील प्रशासन यांना देण्यात आली.
माहिती मिळताच तहसील प्रशासनातील नायब तहसीलदार नाडेकर तसेच तलाठी मंडळ अधिकारी व पोलिस विभागातील काही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळावरून 404 तांब्याचे मोगलकालीन शिक्के ताब्यात घेण्यात आले आहे.
परिसराला सील केले असल्याची माहिती असून ते पूर्ण शिक्के धारणी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले असून पुढील कार्यवाही धारणी पोलीस स्टेशन व पुरातत्त्व विभाग करणार असल्याची माहिती ती मिळाली आहे.