नागपुरात प्राचार्यासह कॉलेजच्या १६ विद्यार्थ्यांना कोरोना Corona 16 college students including the principal in Nagpur

Share This News

नागपूर : नागपुरातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक होत आहे. अशात शाळा-कॉलेज, शिकवणी वर्ग आदी सुरू असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील एका महाविद्यालयातील प्राचार्यांसह १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कॉलेजचे कामकाज व शैक्षणिक वर्ग बंद करण्यात आले आहेत.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाटणसावंगी येथील आदर्श विद्यालय, स्व. आनंदरावजी पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांना व १६ विद्यार्थ्यांना एकाचवेळी कोरोनाची बाधा झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले आहेत. नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपूर्वी आटोक्यात होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. १९ फेब्रुवारीला तब्बल ६४४ नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.