कोरोना ब्लास्ट; नागपूर जिल्ह्यात ४० मृत्यू

Share This News

नागपूर : कोरोनाचा संसर्गाचा नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा ‘ब्लास्ट’ झाला आहे. सोमवार, २२ मार्चला २४ तासांत तब्बल ४० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची जिल्ह्यात नोंद झाली आहे. एकूण ३ हजार ६९६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी झालेल्या चाचण्यांमधुन पुढे आले.
मृत्यू झालेल्यांपैकी २१ कोरोना रुग्ण नागपूर शहराच्या हद्दीतील आहेत. १५ मृत्यू ग्रामीण भागातील आहेत. ४ रुग्ण असे आहेत ज्यांना उपचारासाठी नागपुरात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाला. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एकूण रुग्णांपैकी २ हजार ६२५ रुग्ण नागपूर शहराच्या हद्दीतील आहेत. ५६७ पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. उर्वरित रुग्ण असे आहेत, जे नागपुरात दाखल झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
१५ ते २१ मार्चदरम्यान नागपुरात कडक लाकडाउन करण्यात आले होते. या लॉकडाउनची मुदत रविवारी संपली. सोमवार, २२ मार्चपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठेतील वर्दळ वाढली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठेत वर्दळ कायम होती. ७ वाजेपर्यंत शहरातील डेअरी आदी अत्यावश्यक सेवा कायम होत्या. हॉटेल्स आदी प्रतिष्ठाने सायंकाळी सातनंतर बंद करण्यास सुरुवात पोलिसांनी केली. निर्बंध असल्याने नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत ऑनलाइन मद्यविक्रीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी परवानगी दिली. त्यासंदर्भातही परिपत्रकही त्यांनी काढले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.