कोरोनाने नागपूर जिल्हा परिषदेत प्रवेश बंद Corona blocked entry to Nagpur Zilla Parishad

Share This News

नागपूर : कोरोनाचा विळखा वाढल्याने जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनीही पुन्हा एकदा धसका घेतला आहे. अशात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलिस आयुक्तालय, जिल्हा न्यायालय आदी कार्यालयांच्या परिसरात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेपुढे. हे आव्हान पाहता जिल्हा परिषदेतील प्रवेश बंद करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे जिल्हा परिषदेत सातत्याने येणे-जाणे असते. जिल्हा परिषद सदस्य व अधिकाऱ्यांना कामाच्या निमित्ताने भेटायला येणाऱ्यांची संख्या नागपुरात कमी नाही. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आता नागपूर शहरात एक हजार रुग्णांवर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांना १२ मार्चपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी हे आदेश काढले आहेत. नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात न येता संबंधित विभागांशी दूरध्वनी अथवा ई-मेलद्वारे संपर्क साधावा, असे कुंभेजकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात केवळ पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे. मुख्य प्रवेशद्वार तूर्तास खुले असले तरी तेथे सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. मुख्यालयात येणारे इतर प्रवेशद्वारे यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.