कोरोना इफेक्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांचा यंदा गॅप, परीक्षेसाठी नोंदणी करणारे विद्यार्थी घटले Corona effect! Gap of 12th standard students this year, the number of students registering for the exam has decreased

Share This News

एप्रिलपासून सुरू होणाऱया बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या यंदा घटली आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यंदा शैक्षणिक गॅप टाकला आहे. गेल्यावर्षी बारावीच्या 3 लाख 14 हजार 449 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा मात्र 2 लाख 92 हजार 768 विद्यार्थ्यांनीच परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे.

राज्याभरात दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन होणार असल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई विभागीय मंडळात आतापर्यंत दहावीसाठी 3 लाख 59 हजार तर बारावीसाठी 2 लाख 92 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. कोरोनाचा परिणाम या परीक्षांवर मोठय़ा प्रमाणात झाला आहे. एकही दिवस मुंबईतील विद्यार्थी शाळेत गेले नाहीत मात्र त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

दहावीच्या विद्यार्थी संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. बारावीला गेल्या वर्षी 3 लाख 14 हजार 449 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीसाठी 20 हजार 165 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

दहावीला परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 3 लाख 32 हजार 746 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 31 हजार 136 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यावर्षी 3 लाख 59 हजार 808 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पुर्नपरिक्षार्थी 16 हजार 308 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.