नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक..!
सोमवारी नागपूर जिल्ह्यात ४९८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर सहाजणांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदा ४ हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे. नागपुरात सोमवारी २६३५ नमुने तपासण्यात आले. यातील ४९८ नमुने पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ४३९ , ग्रामीणचे ५७ व जिल्ह्याबाहेरचे दाेनजण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणचा १ व जिल्ह्याबाहेरचे २ जण आहेत. सोमवारी २८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १,३०, ७५९ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. . आतापर्यंत १,३९ ,२५३ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत, तर ४२३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ४२६१ वर पोहोचली आहे. यात शहरातील ३५०२ आणि ग्रामीणचे ७५९ रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख २४ हजार ८०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.