कोरोना पुन्हा फोफावला, २१ जिल्ह्यांत चिंतेत वाढ

Share This News

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक वातावरण तयार झाले आहे.


विदर्भातील नागपूरसह यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, चंद्रपूर येथे परिस्थिती बिकट होत आहे. मुंबईतील रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यातही चित्र फारसे चांगले नाही. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, परभणी, बीड येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मास्क, हेल्मेट, गर्दी कमी करणे, प्रतिबंध आणखी कडक करणे असे उपाय राज्य सरकारला करावे लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. जालना, हिंगोली, नांदेड, सांगली, सोलापूर, नंदुरबार, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत कोरोनाबाबत थोडा दिलासा आहे. असे असले तरी दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय करावे लागणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेज पुन्हा बंद करण्यात आले आहेत. काही जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांत आठवडी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.