कोरोनाचे महाराष्ट्रावर प्रेम आहे की सरकारचे कोरोनावर! Corona loves Maharashtra or the government loves Corona!

Share This News

मुंबईः महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये कोरोना वाढत असताना तो फक्त महाराष्ट्रातच का वाढतो आहे, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. कोरोनाचे महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचे कोरोनावर, असा खोचक प्रश्न मनसेच्या नेत्यांनी सरकारपुढे उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये कठोर लॉकडाऊन सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून खोचक प्रश्न उपस्थित केलाय. महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही. असे असताना
‘महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, गुजरात कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत करोना वाढत नाही. महाराष्ट्रात मात्र वाढतोय. करोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच करोनावर प्रेम आहे? …की स्वतःचं अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि करोनाचा वापर होतोय?,’ असा बोचरा प्रश्न त्यांनी केला आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.