वुहानमधील लॅबनेच केली कोरोनाची उत्पत्ती!

Share This News

बीजिंग
कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी अनेक प्रश्न आजही जगाला भेडसावत आहेत. कोरोना विषाणूची उत्पत्ती ही चीनच्या वुहानमधील एका लॅबमध्ये करण्यात आल्याचे आरोप अनेक देशांनी केले आहेत. पण चीनने संबंधित आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी संभ्रम कायम आहे. पण अलीकडेच एका इंग्रजी वृत्तपत्राने एक धक्कादायक खुलासा केला असून वुहानमधील संबंधित लॅबने चिनी सैन्याच्या गुप्त योजनांसाठी विषाणूंची निर्मिती केली असल्याचे म्हटले आहे. या लॅबने चिनी सैन्यांसाठी विविध प्राण्यांचे इतरही धोकादायक व्हायरस तयार केले आहेत.


या इंग्रजी वृत्तपत्रात असेही म्हटले आहे की, गेल्या नऊ वर्षांपासून वुहानच्या लॅबमधील शास्त्रज्ञ जीवशास्त्रातील डार्क मॅटर विषयावर संशोधन करत होते. दरम्यान त्यांनी अनेक नवीन विषाणूंचा शोध लावला असून त्या विषाणूचा प्रसारदेखील केला आहे. असे विषाणू पसरवण्यात चिनी सैन्यातील काही अधिकार्‍यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका चिनी वैज्ञानिकांने एक र्जनल प्रकाशित केले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की गेल्या तीन वर्षांत चीनमध्ये १४३ नवीन आजार सापडले आहेत.
वुहान लॅबमधील वैज्ञानिकांनी चिनी सैन्यांना प्राण्यांपासून विषाणू शोधण्यास मदत केली आहे. क्षी झेंगली उर्फ बॅट वूमन आणि एक वरिष्ठ लष्करी अधिकारी काओ वुचून स्वत: नमुने गोळा करण्यासाठी अनेक गुहांमध्ये गेले होते. अमेरिकेच्या वेंडन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने असा आरोप केला आहे की, अशा प्रकारचे व्हायरस पसरवण्यात चिनी नागरिक आणि सैन्य दोघंही गुंतले आहेत. वुहान शहरातील लॅबमधून कोरोना विषाणू पसरवण्यात आल्याचा आरोप चीनवर यापूर्वीच केला आहे. पण चीनने हा आरोप अमान्य केला आहे.
आता जागतिक आरोग्य संघटनेनेही हे स्पष्ट केले आहे की, वुहान लॅबमधून कोरोना विषाणू पसरला नाही, तर तो विषाणू एका प्राण्यापासून माणसांत संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशा प्रकारचे स्पष्टीकरण दिले असले तरी, हा विषाणू मानवी जीवनासाठी खूपच घातक ठरत आहे. यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून गेल्या आहे. विषाणू उद्भवाच्या दीड वर्षानंतरही अनेक देशांना उभारी घेता येत नाही.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.