अमरावती विद्यापीठातील ४५ जणांना कोरोना Corona to 45 students from Amravati University

Share This News

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तब्बल ४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वित्त, परीक्षा आदी विविध विभागांचे कामकाज ठप्प होत चालले आहे.


पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत करोनाची दुसरी लाट त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील प्रतिबंध कडक करण्यात आले आहेत. आता अमरावती विद्यापीठाच्या मुख्यालयात कोरोना पसरल्याने महाविद्यालयांचे कामकाज, परीक्षा, निकाल व शैक्षणिक कामकाज बंद पडले आहे. विद्यापीठाने घेतलेल्या चाचणी शिबिरात यापूर्वी २५ पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी बाधित असल्याचे आढळले होते. त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. या तपासणीच्या तीन दिवसांत पुन्हा ४५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता ७० झाली आहे. प्रशासन खबरदारी घेत आहे. परंतु अधिकारी, कर्मचारी वेगाने कोरोनाबाधित होत असल्याने अडचणीत वाढ होत असल्याचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.