मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्युल लोपेज ओब्राडेर यांना कोरोना
मेक्सिको सिटी, २५ जानेवारी,: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्युल लोपेज ओब्राडेर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. ओब्राडर यांनी ट्विट करुन कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे सांगताना मला वाईट वाटत आहे. माझ्यात कोरोनाची सामान्य लक्ष आढळली आहेत. सध्या मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.ओब्राडेर यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालायला विरोध करत मास्क न घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ओब्राडेर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.मेक्सिकोमध्ये आतापर्यंत 17 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून दीड लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.