कोरोनावर उपचाराचा दावा, अकोल्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा

Share This News

अकोला : परवाना नसतानाही कोरोनाचा रुग्ण ठणठणीत बरा करण्याचा दावा करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील एका डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुरुषोत्तम चावके हे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
कोरोनावर यशस्वी उपचार केल्याचा दावा संबंधित डॉक्टर अनेक महिन्यांपासून करीत होता. त्यामुळे मूर्तिजापुरातील केळकरवाडी येथील संत कृपा क्लिनिक बाल व जनरल केअर सेंटरची आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने अकस्मिक पाहणी केली. त्यावेळी तेथे कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असल्याचे आढळले. त्यामुळे पथकाने चावके यांच्या रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी केली. तपासणीदरम्यान रुग्णांवर उपचार करण्याचा कोणताही परवाना चावके यांच्याकडे नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चावकेंविरोधात मूर्तिजापूर पोलिस ठाण्यात तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.