देशात २३,0७0 नवे कोरोनाबाधित, ३३६ मृत्यू
नागपुरात ३२0 पॉझिटिव्ह, ६ बळी
नागपूर : जिल्ह्यात शुक्रवारला दिवसभरात ३९८ जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली, तर नव्याने ३२0 बाधितांची नोंद झाली आहे. शहरातील २, ग्रामीणचे १ व इतर जिल्ह्यातील ३ अशा ६ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३८८४ वर पोहचली आहे. दिवसभरात ४२८८ चाचण्या करण्यात आल्यात. यामधून रॅपिड अँन्टिजेन तपासणीव्दारे २३ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. खासगी प्रयोगशाळेतून ८८, एम्समधून ११, मेडिकलमधून ४२, मेयोतून १0६, माफसूमधून १0, नीरीच्या प्रयोगशाळेतून ९ तर नागपूर विद्यापीठाच्या विषाणू प्रयोगशाळेतून ३१ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत.नवे कोरोनाबाधित
नागपूर – ३२0 भंडारा – ४६
यवतमाळ – ४0
गडचिरोली – ३५
चंद्रपूर – ५0
वर्धा – ३0
देशात गेल्या चोवीस तासांत २३,0७0 नवे कोरोनाबाधित आढळले असून ३३६ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील कोविड रुग्णसंख्या आज तीन टक्क्य़ांनी घटली असून आज ती एकूण रुग्णसंख्येच्या २.७८ टक्के आहे. दैनंदिन कोविड बाधितांच्या संख्येहून दैनंदिन रोगमुक्तांची संख्या जास्त असल्यामुळे उपचाराधीन रुग्णालयातील आणि बाहेरील एकूण) रुग्णसंख्या सातत्याने घटताना दिसते आहे. कोविड रुग्णसंख्या आज २,८१,९१९ राहिली. २८ दिवस सातत्याने राहिलेला हा कल कायम राखत भारतात गेल्या २४तासातही दिवसभरातील बाधितांच्या संख्येहून दिवसभरातील रोगमुक्तांची संख्या जास्त नोंदली गेली.