देशात ४१,८१0 नवे कोरोनाबाधित, ४९६ मृत्यू

Share This News

नागपुरात २८७ पॉझिटिव्ह, नऊ बळी

नागपूर : जिल्ह्यात रविवारी नव्याने केवळ २८७ बाधितांची नोंद झाली तर ३६३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. रविवारला आरटीपीसीआरच्या ४२00 व रॅपिडच्या ९६१ अशा ५१६१ चाचण्या झाल्यात. यापैकी शहरातून २४४, ग्रामीणमधून ३९ व इतर जिल्ह्यातील चार अशा २८७ बाधितांची नोंद झाली. यामध्ये एम्सच्या विषाणू प्रयोगशाळेतून १९ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. दिवसभरात ९ कोरोनामृतकांची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी ४ तर ग्रामीणमधिल एकाचा समावेश आहे. यासोबचत एकूण कोरोनाबळींची संख्या ३६५४ वर पोहचली आहे. मेयो व मेडिकलमधून प्रत्येकी ५८, माफसूमधून १0, नीरीतून ३६, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून १६, खासगी लॅबमधून ७५ तर रॅपिड अँन्टिजेन तपासणीव्दारे १५ जणांचे अहवाल सकारात्मक आले. यासोबतच जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ११ हजार ४७७ वर पोहचली आहे. शहरातील ३१६ व ग्रामीणचे ४७ असे ३६३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.नवे कोरोनाबाधित
नागपूर – २८७
भंडारा – ११६
यवतमाळ – ६६
बुलढाणा – १२१
अमरावती – ८८
चंद्रपूर – ६३
गोंदिया – ११0

गडचिरोली – ५२
गेल्या एका दिवसात ४१ हजार ८१0 रुग्णांची भर पडली. तर, ४९६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी दिवसभरात ४२ हजार २९८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ९३ लाख ९२ हजार ९१९ झाली आहे. यातील ८८ लाख २ हजार २६७ रुग्णांनी कोरोनावर केली आहे. तर, ४ लाख ५३ हजार ९५६ कोरोना रुग्णांवर (४.८३ टक्के) उपचार सुरू आहे.
गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोना बाधितांच्या संख्येत ९८४ ने घट नोंदवण्यात आली आहे. दुर्दैवाने आतापयर्ंत १ लाख ३६ हजार ६९६ कोरोना रुग्णांचा (१.४६ टक्के) मृत्यू झाला आहे. देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी, रविवारी कोरोनामुक्ती दर ९३.७१ टक्के नोंदवण्यात आला.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.