ग्रामीण व जिल्ह्य़ाबाहेरचे ८ रुग्ण दगावले; २४ तासांत ३८५ नवीन बाधितांची भर

Share This News

शहरात केवळ एक मृत्य only-one-death-in-the-nagpur-city-due-to-coronavirus-

नागपूर : विदर्भातील करोनाचे सर्वाधिक बळी नागपुरात गेले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये येथे मृत्यूचा प्रत्येक एक ते तीन दिवसांत नवीन उच्चांक नोंदवला जात होता. परंतु आज मंगळवारी अनेक महिन्यांनी शहरातील मृत्यूसंख्या केवळ एकवर आली. याशिवाय २४ तासांत ग्रामीणचे ३ आणि जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण ९ मृत्यू नोंदवले गेले.

या नवीन ९ मृत्यूमुळे आजपर्यंतच्या शहरातील मृत्यूची संख्या २ हजार ४२८, ग्रामीण ५७५, जिल्ह्य़ाबाहेरील ४२६ अशी एकूण ३ हजार ४२९ वर पोहचली आहे.  २४ तासांत शहरात २४१, ग्रामीणला १३९, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण ३८५ नवीन करोना रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ८२ हजार ७५, ग्रामीण २० हजार ९५९, जिल्ह्य़ाबाहेरील ६०८ अशी एकूण १ लाख ३ हजार ६४२ वर पोहचली आहे.

करोनाबाधिताच्या मृतदेहावर दुसऱ्या रुग्णाच्या नावाची चिठ्ठी

मधुमेहाच्या एका ५७ वर्षीय व्यक्तीची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम दोन रुग्णालयात हलवले असता तेथे करोना चाचणी अहवाल नकारात्मक आला. परंतु कस्तुरचंद पार्क मैदानाजवळच्या रुग्णालयात त्याला करोना असल्याचे निदान झाले. येथे रुग्णाचा मृत्यू झाला. त्यातच त्याच्या मृतदेहावर दुसऱ्याच रुग्णाच्या नावाची चिठ्ठी लावली होती. हा सर्व घोळ बघता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला आहे. लीलाधर बागडे असे दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. तो तिरोडाचा आहे. त्याला ३१ ऑक्टोबरला उपचारासाठी कस्तुरचंद पार्क जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.   या विषयावर ‘किंग्ज वे’ रुग्णालयाच्या ०७१२६७८९१०० आणि ०७१२६७८९१७५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

केवळ ९८९ बाधित  रुग्णालयांत

सध्या शहरात २ हजार ६६७ रुग्ण, ग्रामीणला १ हजार ३७ रुग्ण असे एकूण ३ हजार ७०४ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ ९८९ आहे.  गृहविलगीकरणात २ हजार ३३० बाधितांवर उपचार सुरू आहेत.  आता सर्वच रुग्णालयांत  खाटा रिकाम्या  आहेत.

दैनिक बाधितांहून करोनामुक्त अधिक

शहरात दिवसभरात २९५, ग्रामीणला १०६ असे एकूण ४०१ व्यक्ती करोनामुक्त झाले. ही संख्या नवीन  बाधिताहून अधिक आहे. शहरात करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ७६ हजार ९८०, ग्रामीणला १९ हजार ५२९ अशी एकूण ९६ हजार ५०९ वर पोहचली आहे. करोनामुक्तांचे प्रमाण ९३.११ टक्के आहे.

विदर्भातील मृत्यू

(३ नोव्हेंबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                  ०९

वर्धा                        ००

चंद्रपूर                    ०६

गडचिरोली            ००

यवतमाळ               ०१

अमरावती              ०१

अकोला                 ००

बुलढाणा                ०१

वाशीम                    ००

गोंदिया                   ०१

भंडारा                     ०२

एकूण                    २१


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.