राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली कोरोना लस Corona vaccine administered by President Ramnath Kovind

Share This News

नवी दिल्ली

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  बुधवारी आर आर रुग्णालयाच्या  कोरोना लसीकरण केंद्रास भेट दिली आणि कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली तसेच देशव्यापी लसीकरणात भाग घेतला. देशव्यापी कोरोना  लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सोमवार पासून सुरु करण्यात आला आहे.

मंगळवारी संरसक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील आर आर रुग्णालयाद्वारे लस घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिल्लीच्या हार्ट अँड लंग इन्स्टिट्यूटला भेट दिली तसेच  सपत्नीक कोरोना लसीकरण करून घेतले. तर दुसरीकडे  केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार  मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी उत्तर प्रदेशच्या रामपूर  येथे कोरोना लस घेतली.

केंद्रीय मंत्री आणि पटनाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स पटनाच्या कोरोना लसीकरण केंद्रात   लसीची पहिली मात्र  घेतली.  केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि सिकंदराबादचे खासदार गंगापूरम किशन रेड्डी यांनी  सिकंदराबादच्या गांधी रुग्णालयात कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली.

सोमवारी  उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष   एम. व्यंकय्या नायडू यांनी  चेन्नईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्समध्ये  हैदराबादच्या  भारत बायोटेक द्वारा निर्मिती लस घेतली.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मेदांता रुग्णालयात कोरोना लसीची पहिली मात्रा ग्रहण केली.

केंद्र सरकारने 16 जानेवारी पासून  देशातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  कोरोना   लसीकरण सुरू केले आहे.  पुण्याच्या सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि  हैदराबादच्या  भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन स्वदेशी लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिलेली आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.