प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी करणार

Share This News

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे मळभ आहे. त्यामुळे विधिमंडळात येणाऱ्या प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मुंबईतील विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीमध्ये प्रवेश करणारे सर्व आमदार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी आरटी-पीसीआर करोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.


२७ आणि २८ फेब्रुवारीला व प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार व रविवारी मुंबईतील विधानभवनात यासंदर्भात व्यवस्था करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विधान भवनात १ मार्च, २०२१ पासून निगेटिव्ह प्रेशर सिस्टम कार्यान्वित करण्यात येणार आहे.
आमदारांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षारक्षक यांची बसण्याची व्यवस्था विधिमंडळाच्या बाहेरील तंबूत करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाहीख् असे विधिमंडळ सचिवालयाने जाहीर केले आहे. मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एका आसनावर एक आमदार अशी बैठक व्यवस्था असेल. प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीतही आमदारांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सभागृहात यूजी यंत्रणा, ओझोन यंत्रणा, सॅनिटायझेशन कोटिंग करण्यात येणार आहे. प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. विधानसभा आणि विधानपरिषदेत येणाऱ्या आमदारांना फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हॅण्ड सेनिटायझेशनची बाटली यांचा सेट देण्यात येणार आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.