कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून, वाशिमच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

Share This News

वाशिम : कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला जात आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची तब्येतही बिघडत असल्याचा आरोप केला जात आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याबाबत काही नियम आहेत. मात्र दोन दिवस आधी मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाला बेडशीटमध्ये झाकून ठेवलं जात असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.