कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा महाराष्ट्रात शिरकाव; ८ जण बाधित Corona’s new strain infiltrates Maharashtra; Symptoms found in 8 people
ब्रिटन मध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेन ने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या नव्या स्ट्रेन च्या धोक्यामुळे भारतासह अनेक देशांनी ब्रिटन सोबत हवाई वाहतूक तात्पुरती स्थगित केली आहे. परंतु करोना चा हा नवा स्ट्रेन आता महाराष्ट्रातही आढळून आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच स्वतः याबाबत ट्विटर वरून माहिती दिली आहे. ब्रिटन मधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन करोना ची लक्षणे आढळून आली आहेत. यात मुंबईतील ५,पुणे,ठाणे आणि मीरा भाईंदर येथील प्रतेय्कई एका रुग्णाचा यात समावेश असल्याचं टोपे यांनी सांगितलंय. या सर्वांना विलगीकरणात ठेवले असून त्यांचे कॉटक्ट त्रेससिंग सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.