७५ लाखांच्या जवळपास करोना संक्रमणाचा आकडा देशात Coronavirus In India : Latest Update, 18 October 2020

Share This News

देशात गेल्या २४ तासांत करोना संक्रमणाचे ६१ हजार ८७१ रुग्ण आढळले तर १०३३ जणांचा मृत्यू झाला. परंतु, याच २४ तासांत ७२ हजार ६१४ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केल्याचंही समोर येतंय.

नवी दिल्ली : देशात करोना संक्रमितांची एकूण संख्या जवळपास ७५ लाखांच्या घरात पोहचलीय. भारतातील अॅक्टिव्ह केसेस अर्थात उपचार सुरु असलेल्या रुग्णा संख्येत तेजीनं घटतानाही दिसून येतेय, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत ६५ लाखांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात केलीय. यासोबतच, करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ८८ टक्क्यांवर पोहचलीय. भारतात अॅक्टीव्ह केसेसची संख्या ८० हजारांहून कमी आहे.

देशात गेल्या २४ तासांत करोना संक्रमणाचे ६१ हजार ८७१ रुग्ण आढळले आहेत तर १०३३ जणांचा मृत्यू झाला आहे. हाच आकडा शनिवारी ६२ हजार २१२ वर होता तर मृत्यूचा आकडा ८३७ वर होता.

गेल्या २४ तासांत ७२ हजार ६१४ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केल्याचं समोर आलंय. अर्थात नवीन संक्रमितांपेक्षा आजारातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

यासोबतच, देशातील एकूण संख्या ७४ लाख ९४ हजार ५५१ वर पोहचलीय. यातील ७ लाख ८३ हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण ६५ लाख ९७ हजार २०९ लोकांनी या आजाराला मात दिलीय. देशात आत्तापर्यंत १ लाख १४ हजार ३१ जणांनी करोना संक्रमणामुळे आपले प्राण गमावलेत.

गेल्या २४ तासांत ज्या पाच राज्यांतून सर्वाधिक करोना रुग्ण समोर आलं त्यामध्ये महाराष्ट्र (१०,२५९), केरळ (९०१६), कर्नाटक (७१८४), तामिळनाडू (४२९५) आणि पश्चिम बंगालल (३८६५) या राज्यांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजेच, ४६३ मृत्यू महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत. हीच संख्या उत्तराखंडात ९५, कर्नाटकात ७१, पश्चिम बंगालमध्ये ६१ आणि तामिळनाडूमध्ये ५७ वर आहे.

देशाचा रीकवरी रेट ८८ टक्के, मृत्यू दर १.५ टक्के तर पॉजिटिव रेट  ६.४ टक्क्यांवर आहे.

गेल्या २४ तासांत देशात एकूण ९ लाख ७० हजार १७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत एकूण ९ कोटी, ४२ लाख, २४ हजार १९० नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.