राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयाची नोटीस
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. अभय डोहे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. मतदार यादींमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. या त्रुटी दूर कराव्यात, यासाठी त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज सादर केला. परंतु जिल्हाधिकार्यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. या याचिकेत भारतीय निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करावे, असे आदेशही खंडपीठाने दिले. याचिकाकत्र्यातर्फे अँड. आनंद परचुरे तर, निवडणूक आयोगातर्फे अँड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.