कोणत्याही परिस्थिती गर्दी आवरा : मुख्यमंत्री

Share This News

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘कॉक्टॅक्ट ट्रेसिंग’ करा, कोणत्याही परिस्थिती गर्दी आवरा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत.


कोरोना संसर्गाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीची ई-बैठक घेतली. ठाकरे यांनी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर येथील परिस्थितीचा विशेषत: आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिक बिनधास्त झाल्याचे दिसत आहे. मास्कचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा दररोज सरासरी पाचशे ते सातशे कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. ही बाब निश्चितच परवडणारी नाही. कोरोनाचा संसर्ग कायम राहिल्यास राज्यात किंवा काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाउन करावे लागेल. ही बाब सामान्यांना फटका देणारी आहे. त्यामुळे प्रसंगी प्रतिबंध कडक करा पण गर्दीवर नियंत्रण मिळवा, असे आदेश ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित झालेल्या या ई-बैठकीत सर्व मंत्र्यांनी कोरोनाच्या ‘कमबॅक’बद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. विदर्भातील जास्त प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोणते प्रतिबंध लावायचे आहेत, याबद्दलही मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाणून घेतले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.