Covid 19 चा पुन्हा कहर, देशात २४ तासात वाढले ३५ हजार रूग्ण Covid 19’s havoc again, 35,000 patients increased in 24 hours in the country

Share This News

भारतात कोरोनाच्या वाढत्या केसेसमध्ये आणखी नवीन ३५ हजार ८७१ कोरोना रूग्ण हे गेल्या २४ तासांमध्ये संपुर्ण देशामध्ये आढळल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक अशी रूग्णसंख्या गेल्या २४ तासांमध्ये वाढल्याचे दिसले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. जवळपास १६ राज्यांमध्ये ७० जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आकडा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे, असे निरीक्षण केंद्राने नोंदवले होते. मार्च महिन्याच्या पंधरवड्यातच कोरोना रूग्णांच्या संख्येत १५० टक्के इतकी मोठी वाझ झाल्याची माहिती आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपुर्ण देशातील राज्यांच्या पंतप्रधानांसोबत एक आढावा बैठक नुकतीच घेतली. कोरोना रूग्णसंख्येचा वाढता आकडा पाहून त्यांनीही याबाबतची चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या रोखण्यासाठी पंतप्रधानांनी काही मॅनेजमेंटच्या उपाययोजनांमध्ये मायक्रो कंटेन्टमेंट झोन आणि कोरोनाच्या नियमावलीची सक्तीने अंमलबजावणी यासारख्या उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखता येईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. कोरोना रूग्णांची आतापर्यंत १.१४ कोटी प्रकरणांची नोंद भारतात झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १.५९ लाख रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत म्हटले आहे की, काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक अशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारला या वाढत्या रूग्णसंख्येत जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. जर आपण कोरोनावाढीच्या रूग्णसंख्येला आताच आळा घालू शकलो नाही तर कोरोनाचा पुन्हा एकदा देशव्यापी असा विस्फोट होऊ शकतो असे पंतप्रधानांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. त्यामुळेच मोठी पावले उचलत आपल्याला त्याअनुषंगाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

गेल्या आठवड्यापासून भारतात दररोज २० हजार कोरोना रूग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांध्ये २८ हजार ९०३ प्रकरणांची भर यामध्ये पडली आहे. जवळपास २४ टक्के इतकी नवीन कोरोना रूग्णांची अशी वाढ आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये एकुण १७२ कोरोना मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार या आठवड्यात १८८ कोरोना रूग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. ही आकडेवारी सर्वाधिक आहे.

गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात नव्या २३ हजार १७९ रूग्णांची नोंद झाली. १७ सप्टेंबर २०२० पासूनची ही सर्वाधिक अशी कोरोना रूग्णवाढीची आकडेवारी आहे. महाराष्ट्र सर्वाधिक अशी २३ लाख कोरोना रूग्णांची आकडेवारी आहे. देशातील ६० टक्के अॅक्टीव्ह कोरोना रूग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. तर देशात होणाऱ्या मृत्यूंमध्ये ४५.४ टक्के नव्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद ही महाराष्ट्रात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोना रूग्णवाढीच्या संख्येत केरळमध्ये २०९८, पंजाबमध्ये २०१३, कर्नाटकात १२७५, गुजरात ११२२ यासारख्या रूग्णांची नोंद ही गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे.

संपुर्ण देशभरात कोरोना रूग्णांसाठीची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे देशव्यापी अशी कोरोना विरोधी लसीकरणाची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. संपुर्ण देशात १६ जानेवारीपासून आतापर्यंत ३.६४ कोटी इतके कोरोना रूग्णांचे डोसेस देण्यात आले आहेत. संपुर्ण देशात सध्या कोरोनासाठीचे लसीकरण सुरू आहे. भारताने जुलैपर्यंत ३० कोटी जनतेच्या लसीकरणाचे उदिष्ट ठेवले आहे.

देशात कोरोनाची लस वाया जाण्याचे प्रमाण सध्या ६.५ टक्के इतके आहे. त्यामध्ये तेलंगणात १७.६ टक्के कोरोना लस वाया गेल्याची आकडेवारी आहे, तर आंध्रप्रदेशात ही आकडेवारी ११.६ टक्के इतकी आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने बुधवारी सर्वच राज्यांना कोरोना लस वाया जाण्याच्या आकडेवारीवर तंबी दिली आहे.

देशात वाया जाणाऱ्या कोरोना लसीचा टक्का हा तातडीने कमी झालाच पाहिजे असे फर्मान केंद्राकडून काढण्यात आले आहे. जितक कोरोना लस वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल, तितकाच फायदा हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरले असे मत केंद्रातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत देशभरात कोरोना चाचणीदरम्यान एकुण २३ कोटी ३ लाख १३ हजार १६३ लोकांचे सॅम्पल तपासण्यात आले आहेत. एकाच दिवसात १० लाखांहून अधिक चाचण्या गेल्या २४ तासांमध्ये देशात झाल्याची आकडेवारीही जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनाचा आजार हा येत्या दिवसांमध्ये हंगामानुसार कमी अधिक वाढू शकतो असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. त्यामुळेच हवामानावरच आधारीत असे कोरोनाशी संबंधित उपाययोजना कराव्या लागतील असे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले आहे.

जगभरात आतापर्यंत कोरोना रूग्णांचा आकडा हा १२ कोटी इतका नोंदवला गेला आहे. त्यामध्ये एकट्या अमेरिकेतच २.९७ कोटी रूग्णांची नोंद आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.