कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्यात कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

Share This News

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने बंद करण्यात आलेले अकोल्याचे सात कोविड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यात दोन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. 

अमरावती जिल्ह्यात १४ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ३८ कोविड केअर सेंटर, तीन कोविड डेडीकेटेड हॉस्पिटल आणि एक शासकीय कोविड रुग्णालय कार्यान्वित होते. यापैकी कोविड सेंटर बंद केले होते. ते पुन्हा सुरू केले जात आहे. वाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी सोमवारपासून सेंटर सुरू होतील.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ४ कोविड सेंटर पुन्हा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात २ सेंटर सुरू आहेत. गडचिराेली जिल्ह्यात दाेनच सेेंटर सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोना केअर युनिट त्याच स्थितीत असा आजही सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्व १३ सेंटर सुरू करण्यात येत आहेत. 

कोल्हापुरात दोनच कोरोना सेंटर सुरू कोल्हापूर शहरात रोज १० ते १५ नवीन रुग्णांची भर पडत आहे. सध्या येथे गंभीर स्थिती नसली तरी कोरोनाची दुसरी लाट शहरात येऊच नये म्हणून महापालिका प्रशासन सावध आहे. यापूर्वी १२ कोरोना केअर सेंटर सुरू होती. सध्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व आयसोलेशन हॉस्पिटल येथे दोन कोरोना केअर सेंटर सुरू आहेत. जिल्हाधिकारी पाॅझिटिव्ह उस्मानाबाद : मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ हाेत असतानाच आता जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर हेही काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी लसीचा पहिला डाेस घेऊनही संसर्ग झाला असल्याने प्रश्न उपस्थित हाेत आहेत. दिवेगावकर सध्या घरामध्येच विलगीकरणात आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.