नागपूर : कोरोनाग्रस्ताची मेडीकल रुग्णालयात आत्महत्या

Share This News

नागपूर : नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचाररत असलेल्या एक कोरोनाग्रस्ताने भीतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. पुरुषोत्तम गजभिये असे या रुग्णाचे नाव आहे. यासंदर्भातील माहितीनुसार कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम गजभिये (वय 81) यांच्यावर मेडीकल रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुळे त्यांची हिंमत कमालीची खचली त्यामुळे कंटाळून त्यांनी कोरोना वॉर्डातील शौचालयात ऑक्सीजनच्या नळीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गजभिये यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर आत्महत्या केल्यामुळे त्याबाबत कुणाला कळले नाही. सकाळी स्वच्छता कर्मचारी शौचायल स्वच्छ करण्यासाठी गेला असता रुग्णाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.