नाकाद्वारे कोविड लस? नागपूरच्या ‘या’ रुग्णालयात होणार चाचणी !

Share This News

इंजेक्शन ऐवजी नाकाद्वारे कोविड लसीची चाचणी येत्या दोन आठवड्यात सुरु होणार आहे. नागपूरच्या डॉक्टर गिल्लूरकर रुग्णालयात या लसीच्या चाचणीला सुरवात होणार आहे. नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीची चाचणी प्राण्यांवर करण्यात आली आहे, आता यानंतर मनुष्यांवर चाचणीसाठी केंद्रबायोटेकने सरकारच्या औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे, परवानगी मिळताच या चाचणीला सुरवात करण्यात येणार आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीच्या दोन टप्प्यांची चाचणी गिल्लूरकर रुग्णालयात करण्यात आली होती. यानंतर भारत बायोटेकच्याच नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या कोविड लसीच्या चाचणीला सुरवात होणार आहे. यात पहिला व दुसऱ्या टप्प्यातील चाचणी नागपुरातील गिल्लूरकर रुग्णालयात घेण्यात येणार आहे. यात ८० ते ९० स्वयंसेवकांवर या लसीचे परीक्षण करण्यात येणार आहे. इंजेक्शन द्वारे देण्यात येणाऱ्या लसी पेक्षा नाकाद्वारे देण्यात येणारी लस हि अधिक प्रभावी असल्याचे आतापर्यंतच्या संशोधनातून समोर आल्याची माहिती डॉक्टर चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली. नाकाद्वारे दिलेल्या लसीमुळे शरीरात चारपट अधिक अँटीबॉडीज तयार होतात ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता जास्त वाढत असल्याचं भारत बायोटेक या लस निर्माण करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे. सोबतच नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीकरणात वैद्यकीय साहित्य जसे सिरिंज,इंजेक्शनचा वापर होत नाही. शिवाय नाकाद्वारे हि लस केवळ एकदाच घ्यावी लागणार ज्यामुळे लसीकरणाच्या किमतीतही मोठी घट होणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.