बुलडाण्यात कोरोना क्वारंन्टाइन सेंटरमध्ये क्रिकेट

Share This News

बुलडाणा : कोरोनाची लक्षणे असल्यामुळे किंवा पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे बुलडाण्यात क्वारंन्टाइन करण्यात आलेल्या नागरिकांचा विरंगुळ्यासाठी रंगलेला क्रिकेट सामना सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. कोरोनाचे नियम पाळत हे नागरिक येथे दररोज सकाळी क्रिकेटसह विविध खेळांमध्ये व्यस्त असतात.
बुलडाणा शहरातील अपंग विद्यालयाच्या परिसरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. लक्षणे असणाऱ्या आणि पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना येथे क्वारंन्टाइन करण्यात येत आहे. तब्बल दोन आठवडे या केंद्राच्या बाहरे जाता येत नसल्याने वेळ कसा घालवायचा याचा पर्याय येथे दाखल असलेल्या व्यक्तींनी शोधून काढला आहे. कोविड सेंटरची सीमारेषा न ओलांडता येथे दाखल असलेले व्यक्ती क्रिकेटसह विविध खेळांचा आनंद लुटतात. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवत गप्पा-गोष्टी, केंद्राच्या आत असलेल्या मैदानावर प्रभातफेरी व शतपावलीचा आनंद लुटतात. कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत क्वारंन्टाइन सेंटरमध्येही सर्वसामान्यपणे जगण्याचा आनंद कसा लुटता येतो, हे या नागरिकांनी दाखवून दिले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.