सोशल मीडिया कॉमेंटबाबत नागपुरात गुन्हा

Share This News

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्याविरोधात नागपुरात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सीताबर्डी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम २९४, ५००, ५०४ आणि ६७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांनी सांगितले. राजेश रकज, सुधीर त्रिवेदी आणि विक्रम यादव यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्विटर आणि अन्य सोशल माध्यमांद्वारे यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणाचा तपास सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस करीत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.