“ठाकरे सरकारचं धोरण अयोग्य”माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका.

Share This News

कोणतंही संकट आलं की त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकायची आणि नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण अयोग्य आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस हे बारामती दौऱ्यावर, शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत.

पंचनामे वगैरे याच्या भानगडीत न पडता सरकारने मदत जाहीर केली पाहिजे. ही कोणत्याही राजकारणाची वेळ नाही. केंद्र सरकारने मदत देईलच पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? जबाबदारी झटकून कसं चालेल? पूरस्थितीमध्ये मदत देण्याची पहिली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यांनी तातडीची मदत केलीच पाहिजे. जेव्हा पुराचं संकट राज्यावर आलं तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन आम्ही सर्वतोपरी मदत करु असं आश्वासन दिलं. मोदी सरकार मदत करेलच पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? दरवेळी संकट आलं की जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलायची आणि आपण नामानिराळं रहायचं हे ठाकरे सरकारचं धोरण योग्य नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.