कोरानाकाळात आमदारानेच जमविली गर्दी, मिटकरींविरोधात गुन्हा

Share This News

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन प्रतिबंध कडक करीत असताना आमदार अमोल मिटकरी यांनीच सरकार आदेश मोडत गर्दी जमविल्याने त्यांच्या विरोधात अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील कुटासा येथे आपल्या मूळगावी आमदार मिटकरी यांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली. होती. या मिरवणुकीत पाचशेपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश असल्याने १०० लोकांच्या उपस्थितीला प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र आमदार मिटकरी यांनी काढलेल्या मिरवणुकीत मंजूर क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. याशिवाय मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायजेशन आदी नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे कुटासा येथील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे दहिहंडा पोलिसांनी जमावबंदी आणि साथरोग कायदा नियंत्रण कायद्यातीन आदेश मोडल्याप्रकरणी आमदार अमोल मिटकरी आणि ११ मुख्य कार्यकर्त्यांसह ४०० जणांवर गुन्हे नोंदविले आहे. एक आमदारानेच कोरोनासंदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष करीत केलेल्या या कृत्यामुळे अकोला जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.