आजपासून संचारबंदी; काय बंद, काय सुरू जाणून घ्या

Share This News

नागपूर : कोरोनाचे संकट पाहता सरकारने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज (बुधवार 14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत काय सुरु राहील, काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल याची नियमावली जारी करण्यात आली आहे.

नवी नियमावली

राज्यात कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी लागू होणार

कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही

सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील

जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार यातून वगळण्यात आले आहेत.

अपवादश्रेणीत असलेली सेवा आणि व्यवहार सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आल्या आहेत.

मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.

उपहारगृह, बार, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, फक्त होम डिलिव्हरी किंवा टेक-अवेसाठी परवानगी

मनोरंजन, दुकाने, मॉल ,शॉपिंग सेंटर इत्यादी सर्व सिनेमा हॉल बंद राहतील.

नाट्यग्रह तसेच थेटर पूर्णपणे बंद राहतील.

उद्याने, व्हिडीओ गेम, पार्लर बंद राहतील.

वॉटर पार्क, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले बंद राहतील.

चित्रपट /चित्रवाणी /मालिका /जाहिरातींसाठीच्या शूटिंग बंद असतील.

आवश्यक सेवा न देणारी सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर बंद राहतील.

समुद्रकिनारे, उद्यान, खुली जागा सारखे सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील.

धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील
16.नाभिक दुकाने / सौंदर्य प्रसाधन केंद्रे / केश कार्तानालये बंद राहतील

शाळा, कॉलेज आणि खासगी शिकवणी बंद राहतील

कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही

विवाह समारंभासाठी 25 लोकांना परवानगी

अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

जीवनावश्यक श्रेणीतील बाबी

रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात उत्पादन आणि वितरणसंबंधी आस्थापना असतील. तसेच वितरक, वाहतूकदार, पुरवठा साखळीतले लोक. लशींचे उत्पादन आणि वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, इतर पूरक उत्पादने आणि सेवा.

पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यादुकाने, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह इत्यादी.

वाण्याची किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरीज, बेकऱ्या, सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने

शीतगृहे आणि वखारसेवाविषयक आस्थापना

सार्वजनिक वाहतूक – हवाई सेवा, रेल्वेसेवा, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या.

विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा

स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामे

स्थानिक प्रशासनाची सर्व सार्वजनिक कामे

ऱिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्क ठरवलेली सर्व कामे

सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं ज्यात स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिरी, क्लिअरिंग संबंधीची कामं अशी कामे

दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा, देखभाल दुरुस्ती

मालवाहतूक

पाणीपुरवठा विषयक सर्व कामे, सेवा

शेतीशी संबंधित सर्व कामे आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामे. य़ात बीबियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती हे सर्व समाविष्ट आहे.

आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार

जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स

अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मी

पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबंधी उत्पादने, सुदूर समुद्रात वा किनारपट्टीवरील उत्पादने

सर्व प्रकारच्या कार्गो सेवा

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊडसेवा, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या महत्त्वाच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक सेवा

सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा

विद्युत तसेच गँसपुरवठा सेवा

एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा

टपालसेवा

बंदरे आणि ततस्बंधीच्या सेवा

लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधी उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक मल्टिमोडल वाहतूकदार

कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टनसामुग्री बनवणारे कारखाने

आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमधे कार्यरत कारखाने

स्थानिक आपत्तीनिवारण प्राधिकरणाने जीवनावश्यक ठरवलेली कोणतीही सेवा

वाहतुकीसाठी निर्बंध

अटोरिक्षा = चालक अधिक २ प्रवासी
टँक्सी (चारचाकी) = चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता
बस = पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी
प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल
दुचाकी : केवळ एक
कार : चालक अधिक दोन


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.