भंडारा बनावट बंदूक आणि शस्त्रासह दाेन तरुणांना अटक Daen youths arrested with fake guns and weapons
भंडारा : बनावट बंदुकीसह धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दाेन तरुणांना स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने येथील दसरा मैदानावर गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याजवळून गुप्तीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. रितेश रामसिंग सावंत (२६) रा. बैरागीवाडा भंडारा आणि आकाश भाेजलाल रहांगडाले (२३) रा. सुभाष वाॅर्ड, वरठी आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालीत हाेते. त्यावेळी दसरा मैदानावर दाेन जण शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली त्यावरुन पाेलिसांनी मैदान गाठून या दाेघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता लाेखंडी गुप्ती, चाकू आणि दाेन बीळ धातुच्या बनावटी बंदुक (लायटर गन) आढळून आल्या. हे दाेघे काहीतरी गुन्हा करण्याच्या बेतात असल्याचे लक्षात आले. त्यावरुन पाेलिसांनी या दाेघांना अटक करुन शस्त्र जप्त केली. याप्रकरणी भंडारा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.