वीज व विदर्भासाठी ७ डिसेंबरला ठिय्या आंदोलन

Share This News

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या विदर्भस्तरीय कोर कमिटी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, युवा आघाडी, महिला आघाडीची तातडीची बैठक झुम अँपवर पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. मुख्य संयोजक अँड. वामनराव चटप यांनी समारोप केला. सर्वान्ते चर्चा करून विविध आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले.

उजार्मंत्री, नितीन राऊत यांनी दिवाळीला जाहीर केले की, वीज ग्राहकांचे बिल कमी करणार नाही व वीजबिल भरले नाही तर वीज कापू, या वक्तव्याचे बैठकीत उध्द्व ठाकरे सरकार व उर्जामंत्री नितीन राऊत यांचा निषेध केला. कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने प्रचंड आंदोलने केली. परंतु सरकार सामान्य जनतेला न्याय देऊ इच्छित नाही, म्हणून समितीने नितीन राऊत यांना आवाहन केले की, सर्व सामान्यांची वीज कापन्याच्या अगोदर मुंबई-पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व उद्योगपती, मोठी माणसे, सरकारी बंगले, मंत्रालय, सर्व सरकारी कार्यालये यांची वीज थकबाकी जाहीर करावी. त्यांचे वीजबिल वसूल करावे. त्यांची वीज प्रथम कापावी व नंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विदर्भातील सामान्य माणसांची किंवा झोपडपट्टीत राहणार्‍यांची स्वत: हातात कटर घेऊन वीज कापण्यासाठी येऊन वीज कापून दाखवावी, वीज कर्मचार्‍यांच्या हाताने वीज कापू नये. आम्ही विदर्भवादीसुध्दा येतो, होऊन जाऊ द्या एक वेळा वीजेचे महाभारत विदर्भ राज्य आंदोलन समिती आता विजेची आरपारची लढाई लढणार आहे. कोरोना काळातील विदर्भाच्या जनतेचे वीजबिल संपवा, २00 युनिटपयर्ंत वीज फ्री करा, त्यानंतरचे वीजबिल निम्मे करा, कृषी पंपाचे वीजबिल मुक्त करा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती लढत आहे.

विदभार्तील शेतकर्‍यांचे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील अतवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, संत्रा, धान, मोसंबी, आदीचे प्रचंड नुकसान झाले तरी फक्त विदर्भाला ७ कोटी व उर्वरीत महाराष्ट्राला १९९३ कोटीचे पॅकेज हा उध्दव ठाकरे सरकारच्या विदर्भव्देशी निर्णयाचा निषेध करुन ६५ मि.ली. पावसाचे निकष रद्द करून सरकारने विदर्भातील शेतकर्‍यांना सरसकट २५ हजार रु. रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई द्यावी, तसेच बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना २५ हजार रु. रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार ७ लाख ५८ हजार कोटीच्या कर्जाच्या ओज्याखाली दबले असून आता विदर्भाच्या विकासाला निधी देऊन शकत नाही. ७५ हजार कोटी सिंचनाचा, ५0 हजार कोटी रस्त्यांचा, ४ लाख नोकर्‍यांचा हा बॅकलॉग भरुच शकत नाही म्हणून फक्त स्वतंत्र विदर्भ राज्य हेच उत्तर असून विदर्भ राज्यातच विदर्भाचा विकास होऊ शकतो म्हणून ७ डिसेंबरला विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन करणार असून गांधीजींना साकडे घालून ठिय्या मारणार, निदर्शने करणार आहे. यानंतरही सरकारने कोरोना काळातील वीजबिल संपविले नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ४ जानेवारीला उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरावर विदर्भातून लोक येऊन त्यांच्या घराला घेराव घालतील व ठिय्या आंदोलन करणार आहे. असे अँड. वामनराव चटप अध्यक्ष, वि.रा.आं.स., किशोर पोतनवार, हीराचंद बोरकुटे, अंकुश वाघमारे, मितीन भागवत, कपिल इदे, अनिल दिकोंडवार, कवडु येनप्रेड्डीवार, सुधिर सातपुते, अशोक मुसळे, बळीराम खुजे, रमेश नळे, गोविंद मित्रा, प्रभाकर दिवे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.