वादळी वार्‍यासह पडलेल्या गारांमुळे पिकांचे नुकसान

Share This News

नागपुर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सिंजर, मेंढला, दावसा, साखरखेडा आदी गावात गुरुवारी दुपारी बोरांच्या आकारांची गार झाली. तर काही ठिकाणी हवेसोबत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात असलेला उभा गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी या पिकांना चांगलाच फटका बसला. परिणामी, शेतकरी चांगलाचा चिंताग्रस्त झाला आहे. गुरुवारी सकाळपासूनच वातावरण जोरदार अवकाळी पाऊस पडणार यांचे संकेत देत होते. दुपारी २ ते ३ च्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीट झाली तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. सध्या हरभरा भरण्याच्या अवस्थेत आहे. तर गहुसुद्धा भरण्याच्या अवस्थेत असून, संत्रा, मोसंबी फळांच्या बागांवर या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तसेच बागायती शेती भाजीपाला यांनासुद्धा या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असल्याने शासनाने त्वरित नुकसानीचे सर्व्हे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांची आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.