अमरावतीत आढळला कोरोनाचा घातक अंश

Share This News

नागपूर : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा N440K आणि E484K नावाचा म्युटंट अमरावती येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या चाचणी अहवालात आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. यवतमाळातील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या चाचणी अहवालात वेगळाच म्युटंट आढळला आहे. त्यामुळे यवतमाळ येथे तातडीने लॉकडाउन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत यवतमाळात लॉकडाउन असेल तर अमरावतीत सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाउन असेल.


कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात परिस्थिती बिकट होत चालली आहे. बुलडाण्यात गुरुवारी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. अशात अमरावती, यवमताळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारशी संपर्क साधला व कोरोना परिस्थितीची सरकारी अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर यवतमाळात जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउनचे आदेश दिलेत. अमरावती येथेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रतिबंध कडक केलेत. दर शनिवार ते सोमवारपर्यंत बाजारपेठ व सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व दुकाने रात्री आठला बंद करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. अमरावतीमधील जलतरण तलाव, क्रीडांगणे बंद करयात आली आहे. धार्मिक समारंभासाठी पुन्हा केवळ पाच लोकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अकोल्याबाबतही कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.