माजी नगरसेवकाकडे धाडसी चोरी

Share This News

पिस्तुलाच्या धाकावर लुटले

नागपूर : माजी नगरसेवकाच्या घरात शिरून त्याच्या पत्नीला पिस्तुलाच्या धाकावर लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उमरेड शहरातील बुधवारपेठ परिसरात घडली.
विमल अरूण गिरडकर (वय ४८) याप्रकरणातील फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्यांचे पती अरूण उमरेड नगरपरिषदेतील माजी नगरसेवक आहेत. दोघेही बुधवारीपेठ परिसरातील अरुणोदय- २ विमल कॉम्प्लेक्स येथे राहतात. अरूण रोज संध्याकाळी पाच ते आठ यादरम्यान काही कामांसाठी व फिरण्याच्या उद्देशाने बाहेर निघतात. हा त्यांचा रोजचा नेम आहे. ते घरात नसताना दोन इसमांनी विमल यांच्या घराची ‘डोअरबेल’ वाजवली. विमल यांनी दार उघडले असता, ‘काकाजी कुठे आहेत?’ असे म्हणत या दोघांनी घरात प्रवेश केला. अरुण यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या बरीच असल्याने विमल यांनीही त्यांना घरात घेतले. मात्र घरात शिरताच यातील एकाने त्याच्याकडील पिस्तूल काढले. विमल घाबरल्या. त्यांनी आरोपींच्या सांगण्यानुसार घरातील व त्यांच्या दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज दोघांच्या हवाली केला. या दोघांनी हा ऐवज लुटला तेथून पोबारा केला. दोन्ही आरोपी परिचित असावेत, असा पोलिसांना संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेही कैद झाल्याचे समजते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.