दाऊद इब्राहिमच्या संपत्तींचा लिलाव पूर्ण
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या 6 संपत्तीचा लिलाव पूर्ण झालाय. महाराष्ट्रातील दाऊदच्या 7 पैकी 6 स्थावर मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आलीय. उर्वरित एका संपत्तीसाठी बोली लागू शकली नाही. दरम्यान दारूदचा हस्तक इक्बाल मिर्ची याच्या संपत्तीसाठीही बोली लागली नाही. दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी येथील असलेल्या वडिलोपार्जित बंगल्याचा लिलाव पूर्ण झाला आहे. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव या व्यक्तीने हा बंगला 11 लाख 21 हजार रुपयांची बोली लावून विकत घेतला आहे. दाऊदच्या या 6 मालमत्तांपैकी 4 भूपेंद्र भारद्वाज या बोली धारकाने जिंकल्या असून उर्वरित दोन संपत्ती दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी जिंकल्या आहेत. यांचा लिलाव मुंबई 10 नोव्हेंबरला पूर्ण झालेला आहे. दाऊद इब्राहिम याची रत्नागिरी जिल्ह्यात संपत्ती असून मुंबके गावात सर्वे नंबर ब155 या ठिकाणी 20 गुंठे जागा आहे. सर्वे नंबर 157 मध्ये 27 गुंठे जागा असून सर्वे नंबर 152 मध्ये एकूण 30 गुंठे, सर्वे नंबर 153 मध्ये 24 गुंठे , सर्वे नंबर 155 मध्ये 18 गुंठे, सर्वे नंबर 181 मध्ये 27 गुंठे जागेवर दोन मजली बंगला व घर अशी मालमत्ता आहे. याबरोबरच सर्वे नंबर 81 मध्ये 30 गुंठे जागा असून या जागेवर पेट्रोल पंप व इतर इमारती उभ्या असल्याचे समोर आले आहे.