दयाशंकर तिवारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जाऊन कोरोना कोव्हॅक्सिन लस घेतली

Share This News

महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी संध्याकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. याचवेळी त्यांची 99 वर्षांची आई सरस्वती देवी, त्यांचे लहान बंधू क्षमाशंकर व त्यांच्या पत्नी नी सुद्धा लस घेतली. मेडिकल कॉलेज मधे 99 वर्षाची लस घेणारी सरस्वती देवी प्रथम आहेत. या वेळी मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ सुधीर गुप्ता, उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना महापौर म्हणाले की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कोव्हाक्सिन लस घेतली होती हे त्यांनी आवर्जून सांगितले. नागपुरात 4 लाख लस आली आहेत आणि जे पात्र आहेत असे प्रत्येकानी लस घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.