शेतकरी आंदोलनात सहभागी महिलेचा मृत्यू

Share This News

जळगाव
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, २६ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचारानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटलेले असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्हय़ातील आंबाबरी गावातील स्थानिक रहिवाशी सीताबाई तडवी (वय ५६) या १६ जानेवारीपासून दिल्लीतील शहाजापूर सीमेवरील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्या २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर नंदूरबारला परतत असताना जयपूर स्थानकात त्यांची प्रकृती बिघडली. कडाक्याच्या थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.