‘महाभारता’च्या ‘देवराज इंद्रा’चे निधन

Share This News

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘महाभारता’त इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांचे 10 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले आहे. सतीश कौल यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 74 वर्षांचे होते.
हिंदी आणि पंजाबी चित्रपटांसह त्यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले. ‘महाभारत’, ‘सर्कस’ आणि ‘विक्रम बेताल’ यासारख्या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करूनही 74 वर्षीय सतीश कौल यांचे आयुष्य आजारपण आणि हालाखीत जात होते. लुधियाना येथील एका छोट्या घरात राहणारे सतीश कौल यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, दरमहा भाड्यासाठी 7500 रुपये द्यावे लागतात व औषधांच्या खर्चासाठीही त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे पैसेदेखील नव्हते. अभिनेते सतीश कौल यांनीदेखील औषधांसाठी लोकांकडे मदत मागितली होती. त्यांच्याकडे दोनवेळच्या अन्नासाठी देखील पैसे नव्हते. कोणी तरी औषधे द्या, अशी याचना ते करत होते.
‘महाभारत’ मालिकेबरोबरच ‘आंटी नंबर १’, ‘कर्मा’, ‘जंजीर’, ‘खेल’, ‘राम लखन’, ‘खुनी महल’ यांसारखे सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. एकेकाळी कोट्यावधीची संपत्ती असणारे सतीश कौल आज हलाखीचे जीवन जगत आहेत. चित्रपटांमधून मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी अभिनय शाळा सुरु केली होती. मात्र ती नीट चालली नाही. यामुळे त्यांच्याजवळ असलेला सगळा पैसा संपला. त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा देखील त्यांना सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते. अभिनयाची भूक अद्याप शमली नसून, कुठलेही काम मिळाले तरी करण्यास तयार असल्याचे देखील ते म्हणाले होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.