वाघिणीच्या तीन शावकांचा मृत्यू; उमरेड कर्‍हांडला अभयारण्यातील घटना Death of three cubs of Waghini; Incidents at Umred Karhandala Sanctuary

Share This News

नागपूर, 14 मार्च : नागपूर जिल्ह्यातील उमरेड कर्‍हांडला अभयारण्यात  रविवारी  सकाळच्या सुमारास कॉलरवाली वाघिणीची तीन छावे मृतावस्थेत आढळून आली. कर्‍हांडला प्रवेशद्वारापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही घटना उघडकीस आली असून घटनास्थळी वनाधिकारी पोहचले आहेत.  रविवारी सकाळी गस्ती दरम्यान ही बाब उजेडात आली. अद्याप या तीन छाव्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारामुळे वन्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.