राज्य अपघात मुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार -परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

Share This News

नागपूर, : राज्यातील परिवहन विभागाचे काम हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. आज रोजी एकुण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सुविधांपैकी 80 सुविधा या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात. पुढील काळात परिवहन विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे. परिवहन विभागाच्या माध्यमातून राज्याला अपघात मुक्त करण्याचा निर्धार असल्याचे आश्वासक प्रतिपादन परिवहन व संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. नागपुरातील नारा रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालय (नागपूर ग्रामीण) उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
नागपुरात आधुनिक पध्दतीची परिवहन विभागाची झालेली ही इमारत नागपूरकरांना तत्पर सेवा देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे परिवहन विभागातर्फे राज्यात उत्तम काम चालले असून प्रत्येक वाहन तपासणीसाठी जिल्ह्यात इन्स्पेक्शन व सर्टिफिकेशन सेंटर देण्यात येणार आहे. संगणकीय ट्रॅक विकसीत करून उत्तम वाहक घडविण्यात येत आहेत. उत्तर नागपुरात आरटीओ कार्यालयाची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना परिवहन व शिकाऊ अनुज्ञप्ती तसेच शिकाऊ परवाने आणि अन्य कामासाठी सुविधा झाली आहे.मानेवाडा येथील वाहक प्रशिक्षण केंद्राला मंजूरी देण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) हे 1 डिसेंबर 2003 पासून कार्यान्वित झाले. या कार्यालयाअंतर्गत नागपूर महानगर पालिका क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, व भंडारा या कार्यालयाचा व आधुनिकीकरण व संगणकीकृत सीमा तपासणी नाके कांद्री-रामटेक, खुर्सापार-सावनेर,केळवद, शिरपूर-देवरी व देवाडा- राजूरा यांचा समावेश आहे. हे कार्यालय जुलै, 2008 पासून अन्नधान्य विभागाच्या लाल गोडाऊन मध्ये कार्यरत होते. पाच एकरावर तीन मजली बांधकाम असलेल्या या सुसज्ज्‍ इमारतीत परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.