काकाजींचे आयुष्य संघाला समर्पित होते – सरसंघचालक डॉ. भागवत |Dedicate Kakaji’s life to the Sangh. Bhagwat
अकोला | संघ व स्वयंसेवक कसा असावा हे काकाजी खंडेलवाल यांच्या आयुष्यातुन कळते, एक व्रत एक निष्ठा ठेवून कार्य करणारे स्वयंसेवक असतात,काकाजीनी आपले संपूर्ण आयुष्य संघ विचारांना समर्पित केले अकोल्याला काकाजी मिळाले हे अकोल्याचे भाग्य होते.समाजाला आदर्शवत असणारे आचरण ठेवून जीवन जगले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले ते शंकरलालजी खंडेलवाल जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्ताने अकोल्यात आयोजित ‘संघ समर्पित काकाजी स्मृती ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी सरसंघचालक म्हणाले की, व्यक्तिपूजेपेक्षा अनुकरण अनुसरन हे काकाजी यांच्या आयुष्यातुन शिकायला मिळते मी आणि माझ्या बंधनातून बाहेर पडून समाजासाठी कार्य करणारे योगी असतात समर्पणाची भावना ठेवून कार्य करणारे स्वयंसेवक असतात,संघाचा स्वयंसेवक कोणत्याही वयाचा कोणत्याही भागाचा असू शकतो असे सरसंघचालक भागवत यांनी सांगितले. यावेळी काकाजी खंडेलवाल यांच्यावरील लघु चित्रफीत दाखवण्यात आली,स्मृती ग्रंथ प्रकाशित करण्यात आले यावेळी पहिला काकाजी पुरस्कार उत्कर्ष शिशूगृहाला विजय जानी यांना प्रदान करण्यात आला यावेळी छात्रवृत्ती,सेवा प्रकल्प सुरू करण्यात आला.