भंडारा शहरात टॅफिक सिग्नलचे लोकार्पण

Share This News

भंडारा-भंडारा शहरातील कलेक्टर ऑफिस चौक, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, कुकडे नसिर्ंग होम चौक, लाल बहाद्दूर शास्त्री चौक, नागपूर नाका चौक या प्रमुख चौकांमध्ये नगर परिषद भंडारा तर्फे नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ५८ लक्ष रुपये किंमतीचे ट्रॅफिक सिग्नल बसविण्याचे काम पूर्णकरण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण सोहळा आज नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीला वळण लागून अपघात कमी होण्यास मदत होईल असा विश्‍वास खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरात वाहतूकीला वळण लागण्याच्या दृष्टीने ट्रॅफिक सिग्नल ची व्यवस्था नव्हती. शहरातील प्रमुख चौकांमध्ये लोकांची होत असलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत गरजेची होती. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, वाहतूक पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, गटनेते विनयमोहन पशिने, शमीम शेख, जुगल भोंगाडे उपस्थित होते.
शास्त्री चौकात प्रत्यक्ष उपस्थित राहून या मंडळींनी फित कापून तर अन्य चौकांमध्ये आभासी पद्धतीने हा कार्यक्रम घेतला गेला. राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हाधिकारी चौक व शहरातील अन्य प्रमुख चौकांमध्ये ही व्यवस्था उभी करण्यात आली आहे. अपघाताचे प्रमाण कमी होऊन लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. नागरिकांनी या वाहतूक नियमांचे पालन काटेकोरपणे पण करावे, असे आवाहन यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.