दीपाली चव्हाण प्रकरणी सखोल तपास गरजेचा- प्रकाश आंबेडकर

Share This News

अकोला, 31 मार्च दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणाचा खोल तपास झाल्यास अनेक गंभीर प्रकार समोर येऊ शकतात मेळघाट मधील वाघांची संख्या का कमी होत आहे याची कारणे या प्रकरणावरून समोर येऊ शकतात असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील आयोजित पत्रकार परिषद मध्ये केलय. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणी सखोल तपास होणे गरजेचे आहे. असेही आंबेडकर म्हणाले सरकारने या प्रकरणी तत्परता दाखवली नाही रेड्डी याला निलंबित केले मात्र रेड्डीवर अबेटमेंट चा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकर यांनी केलीय. 
राजकारणातिल गुन्हेगारी घटक आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक म्हणजे हे सरकार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते म्हणाले मुंबईचे माजी कमिशन जे पत्र लिहिले त्यामध्ये शंभर कोटी दर महिना वसूल करण्याचा आदेश दिला, असे म्हटले आहे. गृहमंत्री की कॅबिनेट चा निर्णय किंवा या तीन पर्टी चा निर्णय याचा खुलासा नाही. याच्या उलट गृहमंत्री अमित शहा यांना भेटून दाबण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केलाय. तर भाजपचे सुध्दा यामध्ये सहभागी आहे का, अमित शहा हे म्हणाले की सगळ्याच गोष्टी बाहेर आणू शकत नाही, तेव्हा, शंभर कोटी वसुलीचा भाग आहे, हे कुठल्या सिकरीशीचा भाग आहे असा सवाल आंबेडकर यांनी विचारलाय मुख्यमंत्री यांना साधा प्रश्न, कमिशन कशासाठी नेमले याचा खुलासा करा फोन टॅपिंग झोले आहे , रश्मी शुक्ला यांचा अहवाल काय आहे, बदलीच्या संदर्भात कुठले आमदार, खासदार काय संदेश दिले आणि त्यासोबत खिरापत कितीची होती, हे सांगावे, जर ऑफिशियल टॅपिंग झाले आहे तर कमिशनची अजिबात गरज नाही. मुख्यमंत्री यांनी स्वतावरचा संशय दूर करण्यासाठी त्यांनी तो अहवाल ताबडतोब लोकांसमोर मांडावा, कमिशन नेमायचे यातून शंका असून मुख्यमंत्री यांचे ऑफिस यामध्ये सहभागी आहे का असा प्रश्न आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारलाय. 100 कोटींचे प्रकरण दाबण्यासाठी शरद पवार यांची आणि अमित शहाची भेट झाली असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.