दीपाली चव्हाण आत्महत्या; रेड्डींच्या अटकेसाठीही आंदोलन

Share This News

अमरावती : हरीसालच्या वन परीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या छळाला कंटाळत स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी प्रमुख वन सरंक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेची मागणीही होत आहे.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकदा रेड्डी यांच्याकडे विनोद शिवकुमार हे त्रास देत असल्याची तक्रार केली होती. तसा उल्लेखही चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. रेड्डी यांनी वेळीच कारवाई केली असती किंवा दीपाली चव्हाण यांची बदली केली असती, तर त्या वाचल्या असत्या असे स्पष्ट होत आहे. मात्र रेड्डी यांनी शिवकुमार यांना पाठिशी घातल्याने चव्हाण यांच्या चिठ्ठीतून स्पष्ट होते. त्यामुळे याप्रकरणी रेड्डी यांना सहआरोपी करून तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहापुढे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोवर रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.