दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करणार

Share This News

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत असलेल्या हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करणार अशी ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिली. त्यासाठी त्या महाराष्ट्र राज्य सरकार सोबत तसा पत्रव्यवहार करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गाजत आहे. याचे पडसात देश पातळीवर उमटत आहे. राजधानी दिल्ली येथील भटके विमुक्त आयोगाने दखल घेतली आहे. केंद्रीय विमुक्त घुमंतु एवं अर्ध घुमंतु जनजाती विकास एवं कल्याण बोर्ड नवी दिल्लीचे (भारत सरकार) अध्यक्ष दादा इदाते, डॉ. मनिष गवई (सिनेट सदस्य,रा.तु.म.वि.) बिभीषण जाधव, मारुती पवार यांनी दिपाली चव्हाण प्रकरणासंबंधित राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भटके विमुक्त आयोगाला दिले. वनखात्यातील धाडसी महिला वनक्षेत्रपाल दिपाली चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी शासकीय क्वार्टरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शासकीय पिस्तुलने छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्याचे वन खाते आणि सरकारही हादरले. याप्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. शिवकुमारसह रेड्डी यांनाही सहआरोपी करत अटक केली जावी तसेच आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करावी, चव्हाण यांना मरणोत्तर तरी लवकर न्याय मिळावा, यासाठी हा खटला जलद न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविला जावा, यासाठी उच्च दर्जाच्या सरकारी अभियोक्ता उज्ज्वल निकम नियुक्ती सरकारने करावी, शिवकुमार व रेड्डी यांची विभागीय चौकशी त्वरित सुरु करावी आणि याप्रकरणात दोषी आढळून येणाऱ्या सर्वांविरुध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.