शहरात ब्राऊन शुगरसह आरोपी ताब्यात
चंद्रपूर
स्थानिक गुन्हे शाखाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत ४९ ग्राम ब्रॉऊन शुगर सह एका आरोपीस ताब्यात घेतले असून रामनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोद क्रमांक १२१४/२0२0 कलम क. २१ व गुंगी कारक औषधीद्रव्य आणी मनोअवयवावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५(एन.डि.पि.एस.अँक्ट) अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, हकिकत २३ डिसेंबर २0२0 रोजी स्थानिक गुन्हे शाखा मधिल एन.डी.पी.एस. पथकातील पोउपनि संदिप कापडे,पोहवा राजेद्र खनके नापोशी मिलींद जव्हाण,जमिर पठाण,अनुप डांगे, पोशी जावेद सिददीकी यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली कि, पोस्टे रामनगर परिसरात मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वरील नमुद इसम हा बॉऊन शुगर विक्रीसाठी घेऊन येत आहे, अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. सदर माहीती स्थानिक गुन्हे शाखा चे प्रमुख वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे यांना देण्यात आली.
मिळालेल्या माहीतीचे आधारे सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक सा.यांना देण्यात आली व पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली एक कार्यवाही पथक तयार करण्यात आले. नमुद इसमास मुख्य पोस्ट ऑफिस जवळ प्रियदर्शनि चौक येथे थांबवून त्यास अंमली पदार्थाच्या खबरीबाबत त्यास सविस्तर माहिती दिली व त्याचे अंगाची झडती घेण्याचा उद्देश सांगीतला व त्यास त्यांचे अंग झडती संदर्भात एन.डी.पी.एस. अँक्ट, १९८५ मध्ये असलेल्या कायदेशिर अधिकाराबाबत माहीती दिली. या झडती दरम्यान आरोपी नामे अजय श्याम दुपारे रा. फुले चौक बाबुपेठ याची झडती घेतली असता त्याच्या जवळ एक पांढर्या रंगाची पुडी सापडली त्यात तपकिरी रंगाची पावडर असल्याचे दिसून आले. ही पावडर ब्राऊन शुगर असल्याचे पंच व पोलिस यांची खात्री झाल्याने आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली. सदर पावडरचे निव्वळ वजन ४९ ग्रॅम भरले तसेच सदर पावडर बाबत विचारले असता सदर पावडर नागपुर येथुन आणल्याचे आरोपीने सांगीतले. आरोपीच्या अंगझडतीतील १0 हजार रुपये किमतीचा मोबाईल व ४९ हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर असा ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलिस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सपोनी जितेद्र बोबडे, पोउपनि संदिप कापडे, पोउपनि सचिन गदाने, सफी नितीन जाधव, राजेद्र खनके, पोह. नितीन साळवे, नापोशी मिलींद जव्हाण, जमिर पठाण, अलुप डांगे, पोशी जावेद सिद्दीकी यांनी केली.